Share

महाराष्ट्रात मराठी सक्तीचीचं आहे हे महाराष्ट्राला सांगितल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन – मनसे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज ठाकरे यांच्या मनसेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे. महाराष्ट्रात मराठी सक्तीचीच आहे हे महाराष्ट्राला सांगितल्याबद्दल मनसे नेते अनिल शिदोरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन करत आभार मानले.

सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य आहे, अशी घोषणा केली. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या घोषणेवरून मनसे नेते अनिल शिदोरे यांनी प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रात मराठी सक्तीचीच आहे हे महाराष्ट्राला सांगितल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आणि आभार. त्यासाठी कायदेशीर तरतूद करण्याचेही त्यांनी मान्य केले हे ही स्वागतार्ह. आता आपली जबाबदारी ही की प्रत्येक शाळेत याची अंमलबजावणी होते आहे की नाही हे पहाणे, जय महाराष्ट्र ! असे ट्विट अनिल शिदोरे यांनी केले आहे.

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!