Share

तर मुख्यमंत्री हिंमत दाखवणार का?, मनसेचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचे आहे. मात्र सीबीएससी आणि आय़सीएससी काही शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्यात येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येत्या काळात नियमाचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा इशारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचे करण्यासाठी कायदा अधिक कठोर करून त्यात आवश्यक ते बदल करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली, दरम्यान, मनसेने मुख्यमंत्र्यांना आव्हान देत सीबीएसई ज्ञानप्रबोधिनी सारख्या शाळांमध्ये १० वी पर्यंत मराठी शिकवणे सक्तीचं करण्याची हिंमत दाखवणार का? असे म्हंटले आहे.

मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी ट्विटकरत मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे, मराठी सक्तीचं ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली खरी पण कितवीपर्यंत सक्तीचं याचा तपशील कळला नाही. सीबीएसई, ज्ञानप्रबोधिनीसारख्या शाळांना १० वी पर्यंत सक्तीचं करण्याची हिंमत ते दाखवणार का? याची कडक अंमलबजावणी याच वर्षी होणार का? असा सवाल शिदोरे यांनी केला आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!