Share

वैचारिक मतभेद असल्याने मनसेला आघाडीत घ्यायला कॉंग्रेसचा विरोध कायम

Published On: 

मुंबई – मनसेला महाआघाडीत समावून घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असताना ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. एका बाजूला या घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत स्थान नसेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे मनसेसोबत वैचारिक मतभेद आहेत, त्यामुळे मनसेला महाआघाडीमध्ये स्थान देणे अवघड असल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. मनसे महाआघाडीत सामील होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र कॉंग्रेसने मनसेला आघाडीत घ्यायला तीव्र विरोध केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली राज्यात आकारास येत असलेल्या महाआघाडीमध्ये मनसेला स्थान मिळणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र आता काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे मनसेच्या महाआघाडीतील प्रवेशाला ब्रेक लागल्याचे निश्चित झाले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!