मुंबई : अयोध्येत राम मंदिराचं उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमी पूजन होणार आहे. सुमारे पावणे दोनशे लोक त्यासाठी उपस्थित राहणार आहे. यामध्ये १३५ संत-महंतांचा समावेश आहे. भूमीपूजनासाठी अयोध्येत सजावटीसोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेट्स लावले आहेत. भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या अनुष्ठानाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सहा तासांचं विशेष अनुष्ठान केलं जात आहे. आज सायंकाळी दीपोत्सव साजरा केला जाणार असून शरयू नदीचे घाट सुशोभित करण्यात आले आहेत.
राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यात अलीकडेच हिंदुत्वाच्या दिशेने राजकीय भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भावना मांडल्या आहेत. राज ठाकरे म्हणतात की, जवळपास ३ दशकांचा संघर्ष, शेकडो कारसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता, त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला. उद्या राममंदिराचं अयोध्येत भूमीपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच अयोध्येत उभं राहणारं राममंदिर हे नेहमीचं मंदिर नाही, ते प्रतीक आहे शतकानुशतकं हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचं, अगतिकतेचं, ते प्रतीक आहे कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं, सहनशीलतेचं आणि म्हणूनच ह्या क्षणाचं महत्व वेगळं आहे. तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक कारसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या कारसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला.
राज्यात आज एकाच दिवसात १२ हजार ३२६ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंतची विक्रमी संख्या
काय म्हंटलय राज ठाकरे यांनी पत्रात ?
जवळपास ३ दशकांचा संघर्ष, शेकडो करसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता, त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला. उद्या राममंदिराचं अयोध्येत भूमिपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे.
अयोध्येत उभं राहणारं राममंदिर हे नेहमीचं मंदिर नाही, ते प्रतीक आहे शतकानुशतकं हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचं, अगतिकतेचं, ते प्रतीक आहे कोट्यावधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं, सहनशीलतेचं आणि म्हणूनच ह्या क्षणाचं महत्व वेगळं आहे.
तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक करसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या करसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल. ह्यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन.
अर्थात ह्या क्षणी स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज ह्या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता. सध्या कोरोनाचं संकट आहे पण ज्या इच्छाशक्तीने कोट्यवधी भारतीयांनी राममंदिराचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाच्या संकटावर मात करून भारत बलशाली होईल ह्याची मला खात्री आहे. ‘तमाम हिंदू बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन’.
आपला नम्र,
राज ठाकरे.
संभाजी भिडे अज्ञानी, राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचा जोरदार प्रहार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

