Share

संभाजी भिडे अज्ञानी, राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचा जोरदार प्रहार

Published On: 

अयोध्या : अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. अयोध्येतल्या या ऐतिहासिक प्रसंगासाठी भव्य तयारी सुरू आहे. रस्ते आणि इमारती सजवल्या जात आहेत. भूमीपूजनाचा पवित्र दिवस जवळ येत आहे. दीर्घ संघर्षानंतर हा क्षण प्रत्यक्षात येत आहे, म्हणून अभूतपूर्व तयारी सुरू आहे.

रामललाच्या मंदिराचे भूमिपूजन होण्यापूर्वी अयोध्या राममय झाले आहे. मंदिरे रंगविली जात आहेत. भगवा फडकतो आहे. आजपासून भूमिपूजनाचा तीन दिवसीय विधी सुरू झाला आहे. हा विधी 5 ऑगस्टपर्यंत चालेल. एका बाजूला ही सर्व तयारी सुरु असताना आता रोज नव्या मागण्या समोर येत आहेत.अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या रामाच्या मंदिराच्या मूर्तीमध्ये तर मिशा असाव्यात, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी अयोध्येमधील राममंदिर समितीला केली आहे.

‘अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक’

प्रभू राम अतुलनीय, पूज्यनीय पुरुष दैवत होते. पण आतापर्यंतच्या फोटोंमध्ये राम-लक्ष्मणाला मिशा नव्हत्या. आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्याला राम फोटोमध्ये दाखवले गेले. निदान अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या रामाच्या मंदिराच्या मूर्तीमध्ये तर मिशा असाव्यात, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी अयोध्येमधील राममंदिर समितीला केली आहे.

मात्र अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांनी भिडेंचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. संभाजी भिडेंनी भलतीसलती विधानं करू नयेत, असंदेखील दास म्हणाले. संभाजी भिडेंच्या विधानाचा महंत सत्येंद्र दास यांनी समाचार घेतला आहे. संभाजी भिडे यांनी भलतीसलती विधाने करू नयेत. जर कुठे रामाला मिश्या दाखवल्या गेल्या असतील, तर त्या संभाजी भिडेंसारख्या अज्ञानी लोकांमुळेच, अशा शब्दांत दास यांनी भिडेंवर जोरदार टीका केली. त्यांनी भिडे यांचा उल्लेख अज्ञानी असा केला.

सुशांत सिंग राजपूत प्रकरण;आदित्य ठाकरे यांनी सोडले मौन,म्हणाले…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!