Share

महाराष्ट्राचं हे चित्र दुर्दैवी आहे – राज ठाकरे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : खड्ड्यांच्या मुद्द्यावर मनसे गप्प बसणे शक्यच नाही, गेले काही दिवस आमच्या पक्षातर्फे राज्यभर आंदोलनं सुरु आहेत, व्यवस्थेला जागं करणं सुरु आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. आंदोलन करणाऱ्यांचा आपल्याला अभिमान आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. तर महाराष्ट्राचं हे चित्र दुर्दैवी आहे अस म्हणत खड्ड्यांसंदर्भात राज ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट आहे तशी

राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग असो अथवा मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, पुणे ते थेट चंद्रपूरपर्यंतच्या महापालिका, ह्यांच्या बेजबाबदार आणि असंवेदनशील कारभारामुळे ‘रस्त्यात खड्डे’ म्हणायच्या ऐवजी ‘खड्ड्यात रस्ता’ म्हणावं लागेल अशी सर्वत्र परिस्थिती आहे. खड्ड्यात पडून नागरिकांचा मृत्यू होत आहे. कालच मुंबईतल्या ताडदेवमध्ये सौ.अदिती काडगे ह्या महिला खड्ड्यात पडल्या आणि त्यांच्या मेंदूला जबर इजा झाल्याची बातमी वाचनात आली. महाराष्ट्राचं हे चित्र दुर्दैवी आहे.

ह्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणं शक्यच नाही. गेले काही दिवस पक्षातर्फे, राज्यभर माझ्या महाराष्ट्र सैनिकांची आंदोलनं सुरु आहेत. ही आंदोलनं लोकांसाठी आहेत. असंवेदनशील सरकारी व्यवस्थेला जागं करण्यासाठी सुरु आहेत.

मग ते खड्डयांनी भरलेल्या शीव-पनवेल रस्त्यावर केलेलं आंदोलन, कल्याण-डोंबिवली महापालिकेवर नेलेला मोर्चा असेल, पुण्यातील प्रशासकीय कार्यालयात तिरडी ठेवून निषेध केलेलं आंदोलन, चंद्रपूरमध्ये खड्ड्यात मत्स्यपालन करून केलेलं निषेध आंदोलन, पालघरमधील बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन, बांधकाम विभागाच्या कार्यालयात जावून रक्तदान करणं, मंत्रालयासमोरील प्रतीकात्मक आंदोलन, मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दुरुस्तीसाठी केलेलं यशस्वी आंदोलन, मुंबईत टोलबंद आंदोलनाची हाक, ठाणे शहरातील निदर्शनं असतील. हेतू एकच ह्या व्यवस्थेला स्वतःची लाज वाटावी आणि परिस्थती सुधारावी.

आमच्या आंदोलनातून महाराष्ट्रातील जनतेचा रोष समोर येत आहे आणि ह्याची काहीशी भीती सरकारला वाटत असावी म्हणून महाराष्ट्र सैनिकांवर खटले दाखल केले जात आहेत, त्यांची धरपकड सुरु आहे. पण मुळातच महाराष्ट्र सैनिक असल्या केसेसना घाबरत नाही.
उत्तम दर्जाचे रस्ते हा नागरिकांचा अधिकार आहे आणि तो जर त्यांना मिळत नसेल तर ह्याहून तीव्र आंदोलनं माझ्या महाराष्ट्र सैनिकांकडून होतील. गेले कित्येक दिवसांपासून विविध आंदोलनांनी महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचा मला अभिमान आहे आणि त्यांचं मी अभिनंदन करतो.

https://www.facebook.com/RajThackeray/posts/383416032189552

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!