टीम महाराष्ट्र देशा : राज्य दुष्काळात होरपळत असताना शरद पवारांसह अनेक नेते दुष्काळ भागात दौरे करून शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत आहेत. मात्र या सगळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अगदी उलट भूमिका घेतली आहे. दुष्काळग्रस्त भागांचा दौरा आपण करणार नाही. तो काही टूरिस्ट स्पॉट नसल्याचे त्यांनी सांगितले असून, दुष्काळग्रस्तांसाठी कोणतीही मदत जाहीर करण्याच्या पदावर मी नाही. त्यामुळे नुसते तिथे जाऊन काय होणार. असा सवाल देखील राज ठाकरे यांनी विचारला आहे.
ठाणे येथे कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यापैकी एक राज्यातील दुष्काळाचा आणि दुसरा आगामी विधानसभा निवडणुकीचा होता. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभेचे निकाल काहीही येवोत, विधानसभेची तयारी सुरू करा, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करणार का, या प्रश्नावर त्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

