Share

शेतकरी प्रश्नावर मनसे आक्रमक , मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली चंद्रकांत पाटलांची भेट

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी प्रश्न आणि राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर कमालीची आक्रमक झालेली दिसत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचण्याचा मनसे प्रयत्न करत असल्याचं सांगितले जातंय. मागील आठवड्यात ठाण्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेने मोर्चा काढला होता.

त्यांनतर आता महाराष्ट्रातील दुष्काळसंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये मनसेकडून दुष्काळग्रस्त भागात सरकारकडून उपाययोजना करावी अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

चंद्रकांत पाटील आणि मनसेच्या शिष्टमंडळाच्या भेटीमध्येही दुष्काळग्रस्त भागातील उपाययोजनाबाबत सूचना मांडण्यात आल्या. या मागण्या मंत्र्यांनी मान्य करत ताबोडतोब कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं

काय आहेत मनसेच्या मागण्या

  • दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार अंमलबजावणी करणे.
  • महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीमुळे गुरांना चारा छावणी तथा नागरिक व जनावरांना पाण्याची सोय
  • येत्या ८ दिवसात करून देण्याचे जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणे.
  • दुष्काळ ग्रस्त भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे.
  • केंद्र सरकारच्या आदेशानुसार आलेल्या दुष्काळ निधीच्या विनियोगासाठी स्वतंत्र बँक खाते उघडून तालुकानिहाय केलेल्या खर्च हिशोबाची माहिती मिळावी.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!