Share

Gajanan Kale | “काँग्रेसवाल्यांचा माज उतरवलाच पाहिजे” ; गजानन काळे आक्रमक!

Published On: 

🕒 1 min read

Gajanan Kale | मुंबई : भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी थेट वीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्यावर टीका केली. त्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. तुरुंगात असताना भीतीपोटी माफीनाम्यावर स्वाक्षरी करून सावरकरांनी ब्रिटीशांना मदत केली आणि महात्मा गांधी आणि इतर समकालीन भारतीय नेत्यांचा विश्वासघात केला, असा दावा राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी केला होता. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना राहुल गांधींच्या यात्रेला काळे झेंडे दाखवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान काळे झेंडे दाखवायला गेलेल्या मनसे कर्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत. यावर मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

गजानन काळे (Gajanan Kale) म्हणाले, “पोलीस यंत्रणा मनसे नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड का करतय आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल चुकीचे विधान करणारे राहुल गांधी यांची जोडो यात्रा थांबवून त्यांना अटक करा. कायम महाराष्ट्र व राज्याच्या अस्मिता,प्रतीक याबद्दल आकस असणाऱ्या काँग्रेसवाल्यांचा माज उतरवलाच पाहिजे.”

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांनी देखील राहुल गांधींना कारवाईचा इशारा दिला आहे. “राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कायद्याच्या चौकटीत राहून काही केलं तर ठीक आहे. पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांनी काही केल. तर आम्हाला कारवाई करावी लागेल. त्यांच्या यात्रेला आम्ही सुरक्षा दीली आहे. सुरक्षितपणे त्यांची यात्रा आम्ही बाहेर काढू. पण महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा त्यांनी प्रयत्न करु नये,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्ष बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने वंदना सुहास डोंगरे यांनी वीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत ‘स्वातंत्र्यसैनिकाची बदनामी आणि स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या’प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम ५०० आणि ५०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी-

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, वीर सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिले की, “मै आपका नौकर रहना चाहता हु” आणि त्यावर स्वाक्षरी केली. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली. त्यांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांचा पत्रावर सही करून विश्वासघात केला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!