Share

पद्मश्री राहिबाई पोपरे यांच्या मदतीला आमदार लंके गेले धावून; केली ही मदत…

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे या आदीवासी गावातील सामान्य अशिक्षित महिला असलेल्या राहिबाई पोपरे यांनी देशी बियाण्यांची जपवणूक करीत अतुलनिय कामगिरी केल्याबद्दल त्यांना अलिकडेच पद्मश्री पुरस्कराने गौरवण्यात आले आहे.

तब्बल ५२ पिकांच्या ११४ गावरान वाणांची देशी बियाणे बँकेत जपवणूक करणाऱ्या अकोले तालुक्यातील पद्मश्री राहिबाई पोपरे यांना मिळालेले शेकडो पुरस्कार आता पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी भेट दिलेल्या लोखंडी मांडण्यांमध्ये (रॅक) विराजमान होणार आहेत.

राहिबाई यांनी पारंपारीक पिकांच्या बियाण्यांचे जतन करून अतिशय गौरवास्पद कामगीरी केलेली असून त्यांच्या या कौतुकाच्या स्मृती सन्मानाने ठेवल्या जाव्यात असे सांगत आमदार लंके यांनी राहिबार्ईंसाठी आणखीही काही मदत हवी असल्यास ती तात्काळ दिली जाईल अशी ग्वाही दिली.

आमदार लंके यांच्याशी जिव्हाळयाचे सबंध असलेल्या अकोले तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार लंके यांना त्यासंदर्भात माहीती दिल्यानंतर त्यांनी सर्व पुरस्कार ठेवण्यासाठी किती ‘रॅक’ लागतील याची माहीती घेण्याची सूचना केली. त्यानंतर तात्काळ पाच ‘रॅक’ राहिबाईंच्या घरी पोहच करण्यात आले.

स्वतःच्या मतदार संघाव्यतिरिक्त इतरांकडे राजकिय व्यक्ती सहसा दुर्लक्ष करतात. आमदार लंके मात्र त्यांच्याकडे गेलेल्या कोणत्याही समस्येचे पहिले निवारण करण्याची भूमिका घेउन ती मार्गी लावण्यास प्राधान्य देतात.

राहिबाई यांच्याकडे सर्व प्रकारच्या जुन्या गावरान पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन करण्यात आले आहे. जगभरात अनेक बियाणे कंपन्या आहेत, मात्र त्यांच्याकडे हे वाण उपलब्ध नाहीत. शेकडो वर्षापूर्वी आपले पूर्वज ज्या पालेभाज्या, कडधान्य खात होते त्याचे बियाणे राहिबाईंकडे मूळ स्वरूपात उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!