Share

चमत्कारासाठी देवा एक संधी दे…आमदार मुटकुळेंचे चिंतामणीला साकडे

Published On: 

हिंगोली : देवा, मागील पाच वर्षात विकास कामे केली आता चमत्कार घडविण्यासाठी आणखी एक संधी दे अशा शब्दात आमदार तानाजी मुटकुळे यांनी विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीला गुरुवारी  साकडे घातले.

येथील विघ्नहर्ता चिंतामणी गणपती नवसाला पावनारा गणपती म्हणून प्रसिध्द आहे. गुरुवारी (ता.१२) या ठिकाणी मोदकोत्सव साजरा करण्यात आला. सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेऊन नवसाचा मोदक घेतला. मोदक घेतल्यानंतर नवस पूर्ण होतो यामुळे मागील काही वर्षात या ठिकाणी भाविकांची गर्दी चांगलीच वाढू लागली आहे. यावर्षी सुमारे पावने तीन लाख मोदकांचे वाटप केले. तर हजारो भाविकांनी दर्शन घेतले.

यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनीही गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी गणपतीला काय मागणे मागितले अशी विचारणा केली असता, जनतेची पाच वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्यातून कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला अन विधानसभा मतदार संघात विकास कामे करण्यात आली. सिंचनाचा अनुशेष देखील वेगळा करून घेतला. तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठीही मोठा निधी आणता आला आहे. जनतेच्या विकासाच्या आपेक्षा देखील पूर्ण करणार असल्याचे ही मुटकुळे यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!