🕒 1 min read
Eknath Khadse । मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय लाजिरवाना प्रकार घडला आहे. विधान भवनाच्या बाहेर विरोधक यांनी खोक्यांचा नारा लावला होता. हा नारा मागे देखील लावण्यात आला होता. मात्र यावेळी ’50 खोके एकदम ओके’ हा नारा सत्ताधारी मंडळींना जास्तच झोंबला असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते आमने सामने आले. याच पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात जोरदार राडा पहायला मिळाला. धक्काबुक्कीचा प्रकार देखील घडला. या सर्व प्रकरणावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले कि, विचारांची लढाई विचारांनीच लढली गेली पाहिजे. अधिवेशन काळात विधानभवनाच्या सर्व कोड ऑफ कंडक्टचे पालन झाले पाहिजे. तत्वाची लढाई तत्वाने लढावी. असं एकोमेंकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे योग्य नाही. निषेध किंवा आंदोलन हे शांततेच्या मार्गाने व्हाव, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
अमोल मिटकरी यावर काय म्हणाले ?
विधानभवनातील पायऱ्यांवर आमदारांमध्ये झालेली धक्काबुक्की हा सत्ताधाऱ्यांच्या दादागिरीचा प्रकार आहे, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारवर आरोप केला आहे. आमच्यासारख्या नवीन आमदारांवर अशाप्रकारची दादागिरी योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच, धक्काबुक्की होताना शिंदे गटातील आमदारने आम्हाला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली, असा आरोप मिटकरींनी शिंदे गटावर केला आहे. पुढे ते म्हणाले, दुष्काळाची मागणी करायची म्हणून आम्ही साडेदहाला विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमायचं ठरवलं होतं. मात्र सत्ताधारी आमच्या आधी तिथे पोचले आणि आंदोलन करायला सुरुवात केली. आम्ही आंदोलन शांततेत करत होतो. मात्र शिंदे गटातील शिंदे नावाच्या आमदाराने धक्का-बुक्की करायला सुरूवात केली असल्याचं मिटकरींनी सांगितलं.
महेश शिंदेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ?
महेश शिंदे म्हणाले, “विधीमंडळाचे अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधक आम्हाला घोषणा देत चिथावत होते. सातत्याने ते घोषणा देत होते. मात्र आम्ही सर्व आमदार आमची भूमिका मांडण्यासाठी शांततेने आंदोलन करत होतो. हे आंदोलन सुरु असताना काही विधीमंडळ सदस्य, काही विधानपरिषद सदस्य पाठीमागून पुढे आले आणि आमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी त्यांनी अर्वाच्य भाषा वापरली, धक्काबुक्की केली. हे त्यांचे वर्तन अशोभनीय आहे. तसेच अमोल मिटकरी यांच्याबद्दल सर्व महाराष्ट्राला माहित आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या विचारातील काळा डाग म्हणजे अमोल मिटकरी आहे, असंही शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Khadse | “विचारांची लढाई विचारांनी लढावी…”, विधान भवनाबाहेरील प्रकरणावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रीया
- Amol Mitkari | विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नेमकं काय घडलं? अमोल मिटकरींनी सांगिताला संपूर्ण घटनाक्रम
- Sushma Andhare | “विधान भवनाबाहेर जे काही झालं ते भाजप पक्षाचा एक इव्हेंट होता”, – सुषमा अंधारे
- Vikram Vedha । हृतिक रोशन आणि सैफ अली खान अभिनीत ‘विक्रम वेधा’चा टीझर प्रदर्शित
- Assembly Session 2022 | “ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है” ; धक्काबुक्की झाल्याच्या प्रकारावर भरत गोगावलेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

