सिंधुदुर्ग : देशाचे कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 635 एवढी म्हणजे सर्वात जास्त आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या ही चिंतेचे कारण आहे. संख्या वाढत असल्यामुळे कोरोना ग्रस्तांची तपासणी करणे व त्यांची काळजी घेणे यासाठी लागणारी पी पी इ (Personal protective equipment ) किटचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी सिंधुदुर्गातील सर्व खाजगी डॉक्टरांना 1000 ppe कीट देण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती ट्वीट करून त्यांनी दिली आहे.
पी. पी.इ. किटचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांना सेवा देण्यासाठी अडचणी येत होत्या. परंतु आता हे किट आ.नितेश राणे यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यात सोमवारी उपलब्ध होत आहेत.एकाचवेळी 1हजार किट उपलब्ध होत असल्यामुळे आता डॉक्टर सेवा देण्यासाठी सज्ज होतील. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील डाँक्टरांनी आ.नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.
पी. पी.इ. किटचा तुटवडा असल्यामुळे डॉक्टरांनी त्याची मागणी प्रशासना कडे केली होती. त्यानंतर डॉ मिलिंद कुलकर्णी, डाँ.विद्याधर तायशेटे आणि सहकाऱ्यांनी हा वृत्तांत नितेशजी राणे यांच्या कानावर घातला. याची राणेयांनी गांभीर्याने दखल घेत स्वखर्चातुन 1000 पी.पी.इ. किट खाजगी डॉक्टरांनसाठी दिले आहेत. याशिवाय स्वत:च्या मेडीकल कॉलेज मधे वेगळा १०० खाटांचा isolation वाॅर्ड ही जिल्ह्यातील कोरोनाग्रस्थ रुग्णांसाठी उपलब्ध करुन दिलाय.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

