निलंगा (प्रदीप मुरमे ) : माजी मंत्री तथा निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्थानिक विकास निधीतून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १ कोटी रुपयाचा निधी देवू केला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव ही सध्या चिंतेची बाब ठरली आहे.लातूर जिल्ह्यात सुध्दा विविध उपाययोजना जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या माध्यमातून केल्या जात आहेत.लोकप्रतिनिधी म्हणून या प्रक्रियेत आपले योगदान असावे या भावनेतून मी माझ्या स्थानिक विकास निधीतून १ कोटी रुपये निधी देवू इच्छीतो आहे, असे निलंगेकर म्हणाले आहे.
तसेच या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रे याठिकाणी व्हेंटीलेटरची सुविधा उपलब्ध होण्याकरीता हा निधी खर्च करावा अशी सूचना आ.निलंगेकर यांनी याबाबत जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांना सूपूर्द केलेल्या पत्रात केली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ.निलंगेकर यांनी देवू केलेल्या या निधीबद्दल जिल्ह्यातील जाणकार नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
हेही पहा –


