🕒 1 min read
लातूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची धुरा आता आमदार धीरज देशमुख यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. या आधी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्त्वात बँकेची सुत्रे सांभाळली जात होती. मात्र, ऐनवेळी दिलीपराव देशमुख यांच्या जागी आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता दिलीपराव देशमुख यांनी राजकारणातून पूर्णपणे संन्यास घेतला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणात दिलीपराव देशमुख यांची एकहाती सत्ता राहीली आहे. त्यांच्या कार्यकाळात बँकेची मोठ्या प्रमाणात प्रगती देखील झालेली पाहायला मिळाली. गेली अनेक वर्षे त्यांनी बिनविरोध निवडणूक पार पाडली. यंदा मात्र, त्यांच्यासमोर भाजपने उमेदवार दिल्याने चांगलीच लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या सर्वात दिलीपराव देशमुख यांनी मात्र, निवडणुकीतून माघार घेत सर्व सुत्रे आमदार धीरज देशमुख यांच्याकडे सुपूर्त केली आहेत.
सहकार क्षेत्रात ठसा उमटवलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२१-२६ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माजी मंत्री व सहकारमहर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील #सहकार_पॅनेल च्या सर्व उमेदवारांसह मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. pic.twitter.com/PL3VNUcaxC
— Dhiraj V Deshmukh (@MeDeshmukh) October 18, 2021
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात जोडलेला आहे. त्यामुळे या बँकेवर देशमुख आणि पर्यायाने काँग्रेसचेच वर्चस्व राहीले आहे. यंदा भाजपच्या पॅनलने तकडे आव्हान देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय क्रांतीकारी : पटोले
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- औरंगाबादेत जिल्हा परिषदेच्या जागांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सीईओंनी कसली कंबर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
