Share

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारासाठी मुंबईला न जाता लातूरात उपचार घेऊन बरे झाले अभिमन्यू पवार

Published On: 

प्रदीप मुरमे/औसा-  औसा विधानसभा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी कोरोनावर मात केली आहे.६ जुलै रोजी त्यांची कोरोनाची टेस्ट पाॕझिटिव्ह आली होती.त्यांच्याबरोबरच त्यांच्या चिरंजीवला देखील कोरोनाची लागण झाली होती.

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारासाठी मुंबईला न जाता लातूर येथे उपचार घेण्याचा त्यांनी निर्णय घेतल्यामुळे लातूर येथील दवाखान्यात त्यांच्यावर मागील काही दिवसापासून उपचार सुरु होते.नुकतच त्यांची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली असून औसेकरांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी होय.

आमदार व त्यांच्या चिरंजीव यांनी कोरोनाला हरवल्यामुळे औसा विधानसभा मतदारसंघातील जनतेंनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला.कोरोनाच्या या संकटातून ते नुकतच बाहेर आले आहेत.परंतु तरी देखील घरी काही दिवस विश्रांती न घेता तडक आ.पवार यांनी गुगल मीटच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधून मतदारसंघातील समस्येकडे लक्ष वेधले.

त्याचबरोबर कोरोना या भयावह रोगाच्या पार्श्वभूमीवर प्लाझमा दान करणार असल्याचे त्यांनी या पत्रकार परीषदेत बोलताना सांगितले.मतदारसंघातील कार्यकर्त्यांनीही प्लाझमा दान करण्यासाठी पुढे येण्याची भावनिक साद आमदार पवार यांनी कार्यकर्त्यांना घातली.

महत्वाच्या बातम्या-

केलेल्या पापांची फळे तर भोगावीच लागणार, या अभिनेत्याने केले सलमान खानला ट्रोल!

राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या निधनानंतर शरद पवार थेट त्या कार्यकर्त्याच्या घरी…

रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे…भूमिपूजनाची तारीख ठरली,सुरु झाली जय्यत तयारी

छत्रपती संभाजीराजेंनी घेतले रायगड दर्शन; तब्बल १५० वर्षांनी भरलेल्या हत्ती तलावाचे केले जलपूजन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!