🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले आहे. त्यांच्या अनोख्या अंदाजामुळे ते नेहमीच चर्चेत आली आहे. बॉलिवूडचा डिस्को डान्सर म्हणून त्यांना ओळखले जाते. मिथुन चक्रवर्ती यांचा लहान मुलगा नमाशी चक्रवर्ती लवकरच राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘बॅड बॉय’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती एक कॅमिओ सॉंग करणार असल्याचं बोललं जातं आहे. या गाण्याचं नाव ‘जनाब-ए-अली’ असं आहे. नमाशी चक्रवर्ती आणि अमरीन कुरैशी यांनी रामोजी फिल्म सिटीमध्ये ‘जनाब-ए-अली’ या जबरदस्त गाण्याचं शूटिंग केलं आहे. या गाण्याला पीयूष भगत आणि शाजिया सामजी यांनी कोरिओग्राफ केले आहे.
https://www.instagram.com/p/CRZf3-TMXAE/?utm_source=ig_web_copy_link
याबाबत अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा लहान मुलगा नमाशी चक्रवर्ती म्हणाला, ‘आज मी माझ्या आदर्श व्यक्तीसोबत स्क्रीन शेअर केली आहे, तसेच ऑफ स्क्रीन सुद्धा काम केलं. ३५० चित्रपट आणि ३ राष्ट्रीय पुरस्कार घेतल्याचा अनुभव असलेल्या महान अभिनेता मला आणि माझ्या चित्रपटाला आशिर्वाद दिला आहे. त्यांच्यासोबत एकाच फ्रेममध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.’ असे म्हणत नमाशीने आनंद व्यक्त केला आहे.
मिथुन चक्रवर्ती अभिनयासोबतच उत्तम डान्स आणि अॅक्शनमुळे मिथुन चक्रवर्ती यांना मोठी लोकप्रियता मिळाली. हिंदी सोबतच त्यांनी बंगाली, हिंदी, भोजपुरी,तेलुगू, कन्नड़ आणि पंजाबी सिनेमांमध्ये उत्तम काम केले आहे. त्यानंतर आता त्यांच्या मुलगा देखील त्यांच्या इतकाच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यास यशस्वी ठरेल का याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ 11 खेळाडूंना मिळू शकते श्रीलंकेविरुद्ध संधी
- ‘अमोल कोल्हे फार डोकं चालवू नका; ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलात, त्यांनाच विसरलात’
- ‘गिलच्या बदली खेळाडूचा निर्णय निवड समिती घेणार’, गांगुलीने केले स्पष्ट
- शाब्बास ! ‘या’ कारणासाठी दहा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास; उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
- सावधान! श्रीलंकेचे ‘हे’ खेळाडू करु शकतात धवनसेनेचे दहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
