मुंबई : कोरोनामुळे अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या सोबत नाहीत. मात्र त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा (New Year wishes) दिल्या आहेत. मलायकाने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, मलायकाने अर्जुन करोनामुळे क्वारंटाईन असल्यामुळे अर्जुनला मीस करत आहे. यावेळी तिने अर्जुन सोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ”मी तुला मिस करते आणि माझं पाउट (pout) तुझ्यापेक्षा चांगलं आहे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा.’, असे कॅप्शन मलायकाने दिले आहे. मलायकाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
https://www.instagram.com/p/CYJpnilqX0y/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान अर्जुन कपूर त्याची बहीण अंशुला कपूर, रिया कपूर आणि करण बूलानी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर मलायकाची देखील कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र तिची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आता अर्जुन, रिया, अंशुला आणि करण बूलानी हे होम क्वारंटाइन असून सोशल मीडियावर त्यांच्या फोटोमुळे चांगलीच चर्चा रंगत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘नव्या वर्षात कोरोनाची साथ सरावी आणि जगण्यासाठी प्रत्येकालाच बळ मिळावे’
- जम्मूमध्ये वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी, १२ जणांचा मृत्यू
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरु
- आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे


