Share

राज्यातील वृद्ध, निराधार, दिव्यांग घटकांसाठी सामजिक न्याय विभागाकडून १२५७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात कोरोनाच संकट गहिर झालं आहे. या काळात राज्यातील वृद्ध, निराधार, दिव्यांग घटकांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने त्यांना ३ महिन्यांचे मानधन आगावू देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांनी दिली आहे.

धनंजय मुंढे यांची माहिती –

‘कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वृद्ध, निराधार, दिव्यांग घटकांच्या दृष्टीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संजय गांधी निराधार, श्रावणबाळ यासह ५योजनेंतर्गत येणाऱ्या ३५लाख लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे मानधन एकत्रित मिळणार आहे.’

‘राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत तब्बल १२५७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, वित्त व नियोजन विभागाने त्याला मान्यता दिली आहे. याबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , मा. उपमुख्यमंत्री
अजित पवार यांचे आभार.’

‘संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन या योजनांच्या लाभार्थ्यांना २ दिवसात एप्रिल, मे, जून या महिन्यांचे मानधन बँक खात्यांवर मिळेल.’

‘वृद्ध, निराधार, दिव्यांग घटकांना जीवनावश्यक वस्तू तथा आरोग्यविषयक सुविधांसाठी होणारी अडचण लक्षात घेता आम्ही हा निर्णय घेतला आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकार या संकटकाळी गोरगरीबांच्या मागे भक्कम उभी राहणार आहे.’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!