Share

नवाब मलिक सारखे मंत्री गांजा मारून वाट्टेल ती विधाने करतात

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडीचे नेते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारने कंपन्यांना महाराष्ट्रात औषधी पुरवठा न करण्याचे आदेश दिले असल्याचे म्हटले आहे. यावर भाजपच्या वतीने जोरदार टीका करण्यात येत आहे. याचा पुरवा द्या नसता, माफी मागावी असा पलटवार भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. तर नवाब मलिक सारखे मंत्री गांजा मारुन वाट्टेल ती विधान करत असल्याचा आरोप भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे.

या संदर्भात भातखळकर यांनी सोशल मीडियावर नवाब मलिक यांचा सांगलाच समाचार घेतला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात कोरोनाच्या संकटात राजकारण करू नका, परंतु नवाब मलिक सारखे त्यांचे मंत्री गांजा मारून वाट्टेल ती विधाने करत असतात. केवळ केंद्र सरकारवर दुगण्या झाडणे एवढाच एक धंदा (वसूलीशिवाय) यांच्याकडे उरलेला असल्यामुळे कोरोनाच्या संकटात राज्याला स्मशानकळा आली आहे.’

नवाब मलिक यांनी केलेला आरोप गंभीर आहे. मात्र, त्यावर भाजपच्या वतीने जोरदार पलटवार करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकी बाजू समजून घ्यावी लागणार आहे. या सर्वात सामान्य रुग्णांना वेळेवर आणि मुबलक औषधांचा पुरवठा होणे, हेच सर्वात महत्त्वाचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!