यवतमाळ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) ही शेतक-यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविणारी योजना आहे. शेतक-यांकडून पोकरा योजनेअंतर्गत नोव्हेंबर २0१८ ते मे २0२0 पयर्ंत अर्ज घेणे सुरु होते. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मे महिन्यापासून शेतकर्यांकडून अर्ज घेणे बंद करण्यात आले. मात्र यवतमाळ जिल्ह्यात पोकरा योजनेचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे जिल्ह्यात आजपासूनच शेतकर्यांकडून अर्ज घेण्याला पुन्हा परवानगी देण्यात येत आहे. कृषी विभागाने शेतकर्यांपयर्ंत पोहचून या योजनेचे अर्ज घ्यावे, असे स्पष्ट निर्देश कृषीमंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
नियोजन सभागृहात आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोकरा योजनेचे राज्य समन्वयक विजय कोळेकर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यात पोकरा अंतर्गत अतिशय कमी शेतक-यांना लाभ मिळाला आहे, ही खेदाची बाब आहे, असे सांगून कृषीमंत्री म्हणाले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी याबाबत नियमित आढावा का घेत नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्तिथ केला.
‘गडचिरोलीचा विकास झाल्यास नक्षलवादाचा नायनाट होईल…’
शेतक-यांना या योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी त्यांच्यापयर्ंत पोहचणे, ही कृषी विभागाची जबाबदारी आहे. त्यासाठी कृषी विभागाने सकारात्मक विचाराने काम करून शेतक-यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावे. बाजारात जे विकले जाते तेच शेतात पिकले पाहिजे. यासाठी कृषी विभागाने शेतक-यांना मार्गदर्शन करावे. शेतक-यांमध्ये व्यापारी वृत्ती असली पाहिजे. शेतात पिकलेला माल थेट ग्राहकांपयर्ंत कसा पोहचेल, याचे नियोजन करा. शेतक-यांच्या शेतमाल विक्रीकरीता प्रशासनाने त्यांना जागा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश भुसे यांनी दिले आहेत.
‘प्रशांत भूषण आगे बढो…आप के पिछे पाकिस्तान है…’, भाजप नेत्याची जहरी टीका


