टीम महाराष्ट्र देशा – देशभरातील लॉक डाऊनमुळे नागरीकांचे उत्त्पन्न थांबले आहे, त्यामुळे लॉकडाऊनमुळे गरीबांचे तीन महिन्यांचे लाईटबील शासनाने माफ करावं. सर्व बिल माफ करता येत नसेल तर किमान ५० टक्के वीज बिलाची रक्कम माफ करावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
५० टक्के वीजबिल माफ करण्याबरोबरच पुढील ४ महिने थकबाकीमुळे कोणाचाही वीज कापू नये, अशी मागणीही रामदास आठवले यांनी वीज कंपन्यांना केली आहे. मुंबई उपनगर येथे अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने १८ टक्के वीजबिल माफ केलं आहे. मात्र आणखी वीजबिल माफ करण्याचं आपण त्यांना आवाहन केलं असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.
मुंबई शहरात वीज पुरवठा बेस्ट करत असून मुंबई महापालिकेने स्थायी समितीमध्ये याबाबत ठराव करून ३ महिने वीजबिल किमान ५० टक्के माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.
पुढील 4 महिने कोणाचेही लाईट मीटर कापू नये; वीज कंपन्यांनी 3 महिन्यांचे लाईट बिल 50 टक्के माफ करावे. त्यासाठी राज्य शासनाने निर्णय घ्यावा. मनपा स्थायी समितीने ठराव संमत करावा.मुख्यमंत्री@CMOMaharashtra यांनी याबाबत निर्णय घ्यावा. pic.twitter.com/8IuRBYKK3W
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) April 4, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

