Share

विद्यापिठातल्या कार्यक्रमाला राज्यमंत्र्याची उपस्थिती. जे एन यु प्रकाराचा केला निषेध

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात आज एन.एस.यु.आय, एस.एफ.आय, लोकायत, आंबेडकरी चळवळीच्या संघटना सहित अनेक विद्यार्थी संघटनांनी काल दिल्लीतील जवाहरलाला नेहरु विद्यापीठात (जेएनयू)मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधात ‘निषेध मोर्चा’ आयोजीत केला होता या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी ते म्हणाले की ‘महाराष्ट्रातील एकाही भावंडाच्या केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाही.’

या कार्यक्रमाला मोठ्या संखेने विध्यार्थी उपस्थित होते.ज्या लोकांनी हल्ला केला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याचे AISF कडून सांगण्यात आले.

दिल्लीतील जवाहरलाला नेहरु विद्यापीठात (जेएनयू) त काल विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणीचे पडसाद आज दिवसभर देशभरात आणि राज्यात उमटताना दिसून आले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत निदर्शनं करण्यात आली.

अनेक राजकीय नेत्यांनी या कार्यक्रमांना आपली उपस्तिथी दर्शवली. हा हल्ला आरएसस व अभाविपच्या सदस्यांनी घडवला असल्याचा आरोप केला जात आहे.केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!