Share

मानवी मूत्राच्या माध्यमातून युरिआची निर्मिती;नितीन गडकरींची भन्नाट कल्पना

Published On: 

मुंबई : मानवी मूत्राच्या माध्यमातून युरिआ तयार करण्याची भन्नाट कल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली आहे .मानवी मूत्राच्या माध्यमातून युरिआ तयार केल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, असं सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तालुका पातळीवर युरिन बँकेची स्थापना करण्यास सुचवलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत गडकरींनी ही संकल्पना सांगितली यासंदर्भात स्वीडनच्या काही वैज्ञानिकांशी बोलणी सुरु असून हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.एक लिटर मूत्रामागे एक रुपया द्यावा आणि युरिनपासून युरिआ तयार करावा, अशी अभिनव संकल्पना गडकरींनी बोलून दाखवली.मानवी मूत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नायट्रोजन असतं, मात्र ते वाया जातं. टाकाऊतून टिकाऊ गोष्टींची निर्मिती करणं, हे माझं पॅशन आहे. फॉस्फरस आणि पोटॅशिअम यासारखे सेंद्रीय पर्याय उपलब्ध आहेतच. त्यात नायट्रोजनची भर टाकल्यास रोपांच्या वाढीसाठी आवश्यक पोषकद्रव्यं मिळतील, असा विश्वास गडकरींना वाटतो.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!