सातारा : राज्याचे सहकार मंत्री, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी रात्री त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रात्री उशिरा त्यांना कराडच्या कृष्णा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान बाळासाहेब पाटील याची तब्येत ठीक आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहेत. काळजी करण्याची गरज नाही अशी माहिती कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा पाच लाखांच्या वर गेला आहे. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
‘मी पुन्हा येईल’ हा डायलॉग बिहारमध्ये ‘हम फेर आईम’ असा म्हणावा लागेल…
बाळासाहेब उर्फ शामराव पांडूरंग पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. पाटील यांच्याकडे साताऱ्याच्या पालकमंत्रीपदाचीही धुरा आहे. बाळासाहेब पाटील हे 1999 पासून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
याआधी अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली होती. हे सर्व मंत्री कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेले बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे तिसरे मंत्री ठरले आहेत.
मोठी बातमी: पवार कुटुंबियांची महत्वाची बैठक, नाराजीवर तोडगा निघणार कि वाद वाढणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

