Share

राज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी – बाळासाहेब पाटील

Published On: 

मुंबई : राज्यात यावर्षी पणन विभागाने २१९.४९ लाख क्विंटल विक्रमी कापसाची खरेदी केली आहे. गेल्या दहा वर्षातील ही विक्रमी कापूस खरेदी असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

यासंदर्भात माहिती देताना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, राज्यात हंगाम २०१९-२० मध्ये ४४.३० लाख हेक्टर कापसाची लागवड झाली. पर्जन्यमान सामान्य झाल्यामुळे कापसाचे विक्रमी पीक झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कापसाच्या दरामुळे देशाअंतर्गत व राज्या अंतर्गत कापसाचे दर हे कमी होत गेले. शेतकऱ्यांना हमी दरापेक्षा कमी दराने कापसाची विक्री करण्यांची वेळ येवू नये याकरीता राज्यात कापूस पणन महासंघाची नियुक्ती सीसीआयचे सबएजंट म्हणून करण्यांत आली.

सर्वप्रथम राज्यामध्ये ४० कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले.सातत्याने कापसाचे पडणारे दर तसेच कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव आणि वस्त्रोद्योगावर त्याच्या प्रभावामुळे बाजारपेठेमध्ये खाजगी खरेदीदारांची संख्या कमी होत गेली, असेही सहकार मंत्र्यांनी सांगितले.

पाडापाडीचं राजकारण हि त्यांची लोकशाही; भाजपावर ठाकरेंची खोचक टीका

शेतकऱ्यांना त्रास होऊ नये आणि कापूस खरेदीला विलंब होऊ नये यासाठी सीसीआय व कापूस पणन महासंघाद्वारे अधिकचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. कापूस पणन महासंघाद्वारे परिस्थितीनुरुप १२७ कापूस खरेदी केंद्र कोरोना पूर्वी सुरू करण्यात आली होती. कापूस पणन महासंघाकडील पुरेसा सेवक वर्ग उपलब्ध नसल्याने अधिकचे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आपत्कालीन परिस्थिती पाहून शासनाने कृषी विभागातील कृषी पदवीधर सेवकांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली आणि नवीन कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

हंगाम २०१९-२० मध्ये एकूण १९० कापूस खरेदी केंद्रावर कापूस पणन महासंघद्वारे कापूस खरेदीचे कामकाज सुरू आहे. कापूस पणन महासंघा द्वारे हंगाम २०१९-२० मध्ये एकूण ३. ३३ लाख शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुळे एप्रिल महिन्यात कापसाची खरेदी स्थगित ठेवावी लागल्यामुळे शेतकऱ्यांची प्रतिक्षा यादी वाढत गेली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी पावसाळ्यामध्ये देखील मान्सून शेड उभारून कापूस खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

बुलेट ट्रेन होणार कि नाही? उद्धव ठाकरेंनी घेतली ‘ही’ भूमिका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!