मुंबई- सद्या जगभर कोरोना महामारीची साथ असून भारताने एकूण साडे सहा लाखांहून जास्त रुग्णांचा टप्पा पार केला आहे ज्यातील ४ लाख रुग्ण हे बरे झाले आहेत. या कोरोना रोगाचा धोका हा १० वर्षांखालील मुलांना व ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना असल्याचं निष्पन्न झालं असून अधिक त्यांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.
https://twitter.com/milindrunning/status/1279688269798584320?s=19
पन्नाशी नंतर मधुमेह, हृदयाचे विकार तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने हा रोग बळावतो, त्यामुळे तब्येतीची काळजी घेत आरोग्यदायी जीवन जगणं हे महत्वाचं आहे. यातच मिलिंद सोमण यांनी स्वतःच्या आईला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतानाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्या पुश अप्स व्यायाम करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्या ८२ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या वयात देखील त्यांची शारीरिक तंदुरुस्ती हि भल्या भल्या तरुणांना लाजवेल अशी आहे.
मिलिंद सोमण हे स्वतः ५४ वर्षीय असून ते देखील फिटनेस फ्रिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वयाचा अंदाज लावण हे अवघडच! २०१८ मध्ये त्यांनी स्वतः पेक्षा लहान वयाच्या असलेल्या अंकिता कुंवर या तरुणीशी विवाह केला होता. सद्या ती २८ वर्षांची आहे. मिलिंद सोमण हे ऍक्टर व मॉडेल असून त्यांनी बाजीराव मस्तानी सह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
धक्कादायक : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण
१०६ वर्षांच्या आजोबांनी करून दाखवलं, कोरोनाला चारीमुंड्या चीत करत झाले ठणठणीत बरे
प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शिका सरोज खान यांचं ७१ व्या वर्षी निधन

