Share

१०६ वर्षांच्या आजोबांनी करून दाखवलं, कोरोनाला चारीमुंड्या चीत करत झाले ठणठणीत बरे

Published On: 

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात रोज हजारो लोकांना या आजाराची लागण होत होत आहे. मात्र आपली जिद्द आणि डॉक्टरांचे शर्थीचे पर्यटन यावर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. दिल्लीत तर चक्क १०६ वर्षांच्या आजोबांनी करोनाला यशस्वी लढा दिला आहे. एवढंच नाही तर ते ठणठणीत होऊन घरीही परतले आहेत. विशेष म्हणजे स्पॅनिश फ्लूच्या महासाथीच्या वेळी ते केवळ ४ वर्षांचे होते.

डॉक्टरांनी सांगितलं की, करोनातून ठणठणीत बरे झालेल्या १०६ रुग्णाला राजीव गांधी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोना व्हायरसच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर या आजोबांच्या पत्नी, मुलगा आणि कुटुंबातील इतरांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे.

धक्कादायक : पुण्यात राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या परिवारातील तब्बल ९ जणांना कोरोनाची लागण

एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले की, या १०६ वर्षीय रुग्णाने या अगोदर १९१८ साली स्पॅनिश फ्लू पाहिला होता. त्यावेळी स्पॅनिश फ्लूने जगभरात हाहाकार माजवला होता. एका अंदाजानुसार ‘स्पॅनिश फ्लू’मुळे चार ते पाच कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच त्यावेळी असणाऱ्या जागतिक लोकसंख्येच्या १.७ टक्के लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाला होता.

राज्यातील हॉटेल सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय, मुख्यमंत्र्यांचं मोठ पाऊल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!