मुंबई : बॉलिवूड चित्रपट निर्माती एकता कपूरच्या अल्ट बालाजी वेबसीरीज अॅपचा महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित ‘पौरषपूर’चा टीझर नुकतंच प्रदर्शित झाला. या वेबसिरीज मधील सर्वच कलाकार वेगळ्या भूमिकेत आणि वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. अभिनेता मिलिंद सोमण याचा या वेबसीरीजमध्ये अनोखा लूक पाहायला मिळत आहे.
या वेबसिरीज मधील मिलिंद सोमणच्या लूकला जास्ती पसंती दिली जात आहे. चाहत्यांसाठी ही वेबसीरीज अनोखी पर्वणी ठरत आहे.‘पौरषपूर’ या वेबसीरिजसाठी मिलिंद सोमणने नाकात नथ, धोतर, कपाळाला कुंकू, लांब केस, हातात तलावर असा किलिंग लूक परिधान केला आहे. त्याच्या या लूकवर त्याचे चाहते फिदा झाले आहेत.

मिलिंद सोमणने या वेबसीरीजमध्ये बोरीस नावाचे पात्र साकारले आहे. बोरीस हे पात्र तृतीयपंथी असल्याचे दाखवण्यात आलं आहे. तर ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे ही राणी मीरावतीचे पात्र साकारत आहे.‘पौरषपूर’ ही वेबसीरीज पुरुषी मक्तेदारीविरोधात, महिलांना मिळणारी असमान वागणूक यावर आधारित आहे.
Strong & confident, Veer is the vyapari who has entered Paurashpur. He has a past that haunts his present! Can this vyapari be the change that Paurashpur needs? This epic story & a wave of revolution in #Paurashpur is coming soon. Teaser out on 6th Dec. @ektarkapoor @Shaheer_S pic.twitter.com/UcFsGqw4n5
— ALTT (@altt_in) December 4, 2020
महत्वाच्या बातम्या
- लोकशाही मार्गाने चालणाऱ्यांना देशद्रोही, नक्षलवादी ठरवले जात आहे : सचिन सावंत
- आज भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले – उद्धव ठाकरे
- चैत्यभूमी येथे भव्य स्तूप उभारण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी
- ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात 14 डिसेंबरपासून होणार मोठा बदल
- सिद्धार्थ हॉस्टेलची इमारत लवकरच उभारणार – रामदास आठवले

