🕒 1 min read
मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत ही वाढत होत आहे. अनेक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोनाची या बिकट परिस्थितीमध्ये बॉलवूडमधील अनेक सेलिब्रिटी लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.
कोरोना काळात देशभरातील हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे लोकांवर भूकमारीची वेळी आहे. लोकांना एक वेळचं अन्न खाण्यासाठी देखील काही जणांकडे पैसे उरलेले नाहीत. अशा परिस्थितीत देशभरातील अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे करत आर्थिक मदत तसेच जेवण देखील पुरवताना दिसत आहेत.
प्रसिद्ध बॉलिवूड गायक मिका सिंग याने देखील आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं तब्बल 10 हजार लोकांना अन्नदान केलं. त्याच्या वाढदिवसानिमित्त मिका सिंगने गरीबांना अन्नदान केलं आहे. आज मिका सिंगचा वाढदिवस आहे. 44व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपच्या यशामागे मोदींचा चेहरा, तेच भाजपचे नेते’, राऊतांनी कौतूक केल्याने भुवया उंचावल्या
- चंद्रकांतदादांनी ‘असं’ करायला नको होतं, जयंत पाटलांचा टोला
- मराठा वसतिगृहासाठी जालन्यातील १५१ ग्रामपंचायतीमध्ये निषेध आंदोलन
- न्यूझीलंडला हरवण्यासाठी टीम इंडियासज्ज ; मैदानात उतरताच विराट म्हणाला…
- कलम-३७० चा परिणाम; भारतीय कंपन्यांना क्रिकेट प्रक्षेपणाचे हक्क देण्यास पाकिस्तान सरकारचा नकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
