औरंंगाबाद : सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या पत्नी व बहिणीचे एडीट केलेले अश्लिल फोटो सोशल मिडियावर व्हायरल करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणात भाविक नितीन रागिना (वय ३०, रा. जीवन हॉस्पीटल, सिव्हील लाईन यवतमाळ) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. वाडकर यांनी शुक्रवारी (दि.१९) दिले.
प्रकरणात ३३ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने फिर्याद दिली. त्यानूसार, फिर्यादी हे पुण्यातील एका कंपनीत काम करतात. २५ सप्टेबर रोजी रात्री एक वाजता फिर्यादी हे त्यांचे फेसबूक अकाउंट बघत असतांना त्यांच्या फेसबूक मॅसेंजरच्या मॅसेज रिक्वेस्टमध्ये नितीन रागीना नावाच्या व्यक्तीच्या फेसबूक अकाउंटवरून फिर्यादीच्या पत्नीचे एडीट केलेले अश्लिल फोटो पाठविले होते. फिर्यादीने सदरील फेसबुक अकाउंटची पडताळणी केली असता नितीन रागीना हे भाविक रागीनाचे वडील असल्याचे समोर आले. आरोपी भाविक रागीना आणि फिर्यादी हे जळगाव येथे असतांना एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. यापूर्वी देखील भाविक रागीना याने त्याच्या फेसबूक अकाउंटरवरुन एप्रिल ते जुलै २०२० दरम्याच फिर्यादीच्या फेसबुक अकाउंटवर अश्लिल मॅसेज व जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच भाविक रागीना याने फिर्यादीला जातीवचक शिवीगाळ करणारे तसेच प्रांतवाद निर्माण करणार्या शब्दप्रयोगांचा वापर केला होता.
भाविक रागीना याने फिर्यादीच्या मीत्र, मैत्रणींच्या फेसबुक अकाउंटला देखील अश्लिल मॅसेज व फिर्यादीच्या पत्नीचे एडीट केलेले अश्लिल फोटो पाठविले आहेत. फिर्यादीच्या मीत्रांनी याविरोधात ऑनलाईन तक्रार देखील दिली आहे. प्रकरणात फिर्यादीने देखील सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद येथे ऑनलाईन तक्रार दाखल केली. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- ‘सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी, असे अनेक कार्यक्रम होतील !’
- ‘पैसे फेकले की सर्व विकत मिळते हा नवा सिद्धांत भाजपने रुजवला’
- ‘ठाकरे सरकार’ आल्यापासून लोकांच्या मनातले भय नष्ट झाल्याने लोक निर्भय बनून मतदान करीत आहेत’
- ‘सत्ता गेली की अक्कल, अक्कल गेली की भांडवल, भांडवल गेले की कुंपणावरचे कावळे उडून जातात’
- शिवसेनेला साथ देणं एमआयएम नगरसेवकांना भोवलं; पक्षाने केली हकालपट्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

