नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. युजीसीच्या गाईडलाईन्सनुसार या परीक्षा घेण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. या परीक्षा घेताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. या संदर्भातील एक पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना दिलं आहे. यामुळे ठाकरे सरकारने जरी परीक्षा रद्द केलेली असली तरीही विद्यापीठांनापरीक्षा घ्याव्या लागणार असल्याचे दिसत आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने शिक्षण विभागाला पत्र पाठविले असून विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास अनुमती दिली आहे. तसेच उच्च शिक्षण संस्थाही परीक्षा घेऊ शकणार आहेत. मात्र, या परीक्षा युजीसीच्या गाइडलाइन्सनुसार घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. युजीसीही लवकरच परीक्षांसाठी नियमावली जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रीय आरोग्य खात्याच्या नियमांनुसार परीक्षा व्हाव्यात, असेही या पत्रामध्ये म्हटले आहे.
राणे साहेब ‘काय होते तुम्ही, काय झाले तुम्ही’; रोहित पवारांचा नारायण राणेंना टोला
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन यामुळे अनेक राज्यांनी आपल्या विद्यापीठांच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. महाराष्ट्र सरकारने सुद्धा विद्यापीठांच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता यावर राज्य सरकार काय भूमिका घेतं हे पहावं लागेल.
ग्रामपंचातींकडून केंद्राच्या निधीच्या व्याजाचे पैसे मागत आहे राज्य सरकार; भाजपने डागली तोफ


