Share

राणे साहेब ‘काय होते तुम्ही, काय झाले तुम्ही’; रोहित पवारांचा नारायण राणेंना टोला

Published On: 

पुणे : नारायण राणे साहेब मविआ त मतभेद आहेत असे आपण म्हणालात, पण मतभेद हे जिवंत लोकशाहीचं तर आदेश हे हुकूमशाहीचं लक्षण आहे. इथं प्रत्येकजण मत मांडतो. त्यातून मतमतांतरं होत असतात, फक्त त्याला तुम्ही मतभेद असं नाव दिलं. कारण तुमच्याकडं चर्चेची नाही तर एकानेच निर्णय घेण्याची पद्धत आहे. असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते आणि खासदार नारायण यांना लगावला आहे.

‘दुसरं म्हणजे मला माहित असलेले राणे साहेब सामान्यांच्या प्रश्नावर प्रचंड आक्रमकपणे मुद्देसूद बोलणारे होते. तेच आज लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचत असल्यासारखे वाटले. बेस्टच्या खाजगीकरणावर बोलताना रेल्वेचं खाजगीकरण, इंधन दरवाढ यावर ते शांत बसले’. अस देखील रोहोत पवार म्हणाले आहेत.

तर दुसरीकडे ‘वास्तविक, आज हेच प्रश्न केंद्र सरकारकडे खास ‘राणे स्टाईल’मध्ये मांडून त्यांनी ते सोडवायला पाहिजेत. पण दुर्देवाने आज त्यांना बोलताना ऐकूण असं वाटतं की.. ‘काय होते तुम्ही काय झाले तुम्ही?’ असा थेट टोला सुद्धा रोहित पवार यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.

‘राज्याला चार महिन्यात १० वर्ष मागे घेऊन जाण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले’

दरम्यान, भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी महाविकास आघाडीतील मतभेद आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासार जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यात कोरोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यास त्यावर उपाययोजना शोधण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मविआ सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. करोनाच्या प्रश्नांवर मंत्र्यांच्या बैठका सुद्धा आयोजीत केल्या जात नाहीत. मुख्यमंत्री हे मातोश्रीच्या बाहेर सुद्धा पडत नाहीत. त्यामुळे मंत्रालय हे मुख्यमंत्री सांभाळत नसुन अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांना जनतेच्या प्रश्नांची जाण नाही. ते जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. प्रशासन हाताळण्यास आणि निर्णय घेण्यास ते सक्षम नाहीत. अस नारायण राणे म्हणाले आहेत.

ग्रामपंचातींकडून केंद्राच्या निधीच्या व्याजाचे पैसे मागत आहे राज्य सरकार; भाजपने डागली तोफ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!