Share

मैत्रीण इशा झा यांनी गाजवली हर्षवर्धन जाधवांची सभा

Published On: 

औरंगाबाद : नेहमी चर्चेत असणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड येथे आज सभा घेतली. या सभेत त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीबद्दल भाष्य केले. पण उपस्थितांच्या आकर्षणाचे स्थान मात्र हर्षवर्धन यांच्या मैत्रीण इशा झा होत्या. ह्या सभेत इशा यांनी हर्षवर्धन यांच्या आईचा आशीर्वाद घेत भाषणाला सुरुवात केली.

कन्नड येथील सभेत हर्षवर्धन यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीबाबत भाष्य केले. आपल्या मुलाचे कौतुक करत त्यांनी आपला मुलगा येणाऱ्या काळात कन्नडचा भावी आमदार होणार अशी भविष्यवाणी केली. या सभेत हर्षवर्धन यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. सोबतच त्यांच्या मैत्रीण ह्या सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होत्या.

“मी जेव्हा हर्षवर्धन जाधव यांना भेटले, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांचं शिक्षण लंडनमधून झालं आहे. ते जेव्हा कलेक्टर, लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांशी बोलतात, तेव्हा हर्षवर्धन यांच्या ज्ञानाने तेही गपगार होतात. आणेवारी, वीज कनेक्शन, आरोग्य, हायवे बांधकाम असा कुठलाही विषय असो, त्यांचा अभ्यास खूप आहे” अशा शब्दात इशा यांनी हर्षवर्धन यांच्यावर स्तुती सुमने उधळली.

मागील काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन यांनी पुणे येथे किरकोळ अपघाताच्या वादातून एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इशा झा यांनीही संगनमताने शिवीगाळ करत हात आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप तक्रारदार अमन अजय चड्डा यांनी केला होता. तेव्हापासून इशा ह्या प्रकाश झोतात आल्यात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!