Share

महिन्याभरात वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा भरणार, राजेश टोपेंचा मोठा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेचा इथून मागचा ढिसाळ कारभार दिसून आला आहे. अनेक जागा रिक्त असूनही डॉक्टरांची भरती केली नसल्याने आज उपलब्ध असलेल्या डॉक्टरांवर ताण येत आहे. यासाठी आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. महिनाभरात वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत टोपे म्हणाले की, राज्यातील कोरोनाचा वाढता कहर पाहता, राज्य सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा महिनाभरात भरण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही परीक्षा न घेता, पूर्वीच्या शैक्षणिक पातळीवरील परीक्षांवरुन या जागा तातडीने भरल्या जातील.

तसेच सार्वजनिक आरोग्य विभागात 17 हजार 337 जागा रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागात 11 हजार जागा रिक्त आहेत. राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. या सर्व जागा आम्ही महिनाभरात शंभर टक्के जागा भरणार आहोत. त्यासाठी वेगळा विभाग तयार केला जात आहे. परीक्षा न घेता त्यांच्या जुन्या ज्या परीक्षा असतील जसे नर्सिंग कॉऊन्सिल, MBBS ची झालेली परीक्षा, पीजीचे मार्क असतील या आधारावर या जागा भरल्या जाणार आहेत, असेही राजेश टोपे म्हणाले.

दरम्यान मुंबईतील एमएमआरडीए मैदानात क्वारंटाईन सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे हेही उपस्थितीत होते.

महत्त्वाच्या बातम्या 

चव्हाणांंनी मंदिराच्या सोन्याची काळजी करु नये, PM मोदींच्या नेतृत्वात सुवर्णयुग येणार : विखे

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा ; १ लाख कोटींचं पॅकेज जाहीर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!