🕒 1 min read
नवी दिल्ली : देशभरात आज (२९ जून) पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले पाहायला मिळत आहेत. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ पैशांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरात प्रति लिटर १२ पैशांची वाढ झाली आहे. काल (२८ जून) पेट्रोल-डिझेलमध्ये कोणतीही दरवाढ झाली नव्हती. मात्र, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत.
सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पायदळी तुडवत भाजप खासदाराने मुलाचे लग्न थाटात दिले लावून
गेल्या महिन्यात उत्पादन शुल्कात मोठी वाढ करण्यात आल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाच्या बिकट परिस्थितीला जनता तोंड देत असताना इंधनाच्या दरात सातत्याने वाढ करुन जनतेची खुलेआम लूट करण्याचा कार्यक्रम मोदी सरकारने चालवला आहे असा आरोप विरोधक करत आहेत.
सामान्य माणूस कोरोनाच्या संकटाशी झगडतोय, त्याच्याशी लढा देतोय. या सगळ्या संकटात त्याला इंधन दरवाढीचा शॉक नको. इंधन दरवाढीमुळे सामान्य माणूस आणखी त्रस्त झाला आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर इंधनाचे दर नियंत्रणात आणावेत अशी बसपाच्या सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केली आहे.
वीज बिलाचा आकडा पाहून रेणुका शहाणेला बसला शॉक; ट्विट करत व्यक्त केला संताप
दरम्यान, मायावती यांनी चीनच्या मुद्द्यांवर सध्या देशात काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं घाणेरडं राजकारण सुरु आहे. सध्याच्या काळात ते आजिबात योग्य नाही, असंही म्हटलं आहे. यांच्या आपसातील लढाईमध्ये सर्वाधिक नुकसान देशाच्या जनतेचं होतं आहे असं मायावतींनी म्हटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
