Share

फायद्यासाठी मोदी मागास वर्गात सामील झाले : मायवती

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवत बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायवती यांनी मोदी उच्चवर्णीय होते. मात्र गुजरातमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी आपल्या जातीला मागास वर्गात समाविष्ट केले. मागास लोकांचा हक्क हिसकावण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी मोदी मागास वर्गात सामील झाल्याचा आरोप मायावती यांनी केला. तसेच मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्याप्रमाणे मोदी जन्मत: मागास नाहीत, असंही मायावती यांनी पत्रकार परिषदेते सांगितले.

मी मागास जातीचा आहे. त्यामुळे विरोधक आपल्याला नीच म्हणतात असे  पंतप्रधान नरेंद्र मोदी कनोज येथील सभेत म्हटले होते तसेच , अखिलेश आणि मायावती यांनी देखील आपल्याला नीच म्हटल्याचं मोदींनी सांगितले होते.  यावर मायावती यांनी मोदीं उच्च जातीचे होते. परंतु, कालांतराने ते मागास जातीचे झाले. आम्ही पंतप्रधान मोदींना कधीही नीच म्हटले नाही. संपूर्ण सन्मानाने आम्ही त्यांना उच्चवर्णीय समजले. मग त्यांना नीच म्हणण्याचा विषय आलाच कुठून, असा सवाल मायावती यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मागील पाच वर्षांच्या सत्ता काळात भाजपने दिलेल्या आश्वासनांच्या २५ टक्के देखील काम केले नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशात आतापर्यंत झालेल्या तीन टप्प्यातील निवडणुकीत भाजप पिछाडीवर असल्याचा दावा मायावती यांनी केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!