लातूर: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूलावरून एका माथेफिरुणी उडी मारल्याची घटना घडली आहे. या घटनेत उड्डाणपुलावरून उडी मारल्याने त्या माथेफिरूचा एक पाय पूर्णपणे मोडला असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना सोमवारी दि . १४ जून रोजी सकाळी ८ च्या सुमारास घडली असल्याची माहिती येथील स्थानिकांनी सांगितली. या माथेफिरूचे आडनाव गायकवाड असल्याचे समजते.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावरून गायवाड नामक माथेफिरुणे चाँदनी बागेच्या समोर उडी मारल्याची घटना घडली. त्याने उडी मारली व बऱ्याच वेळ तो रस्त्याच्या कडेला पडून होता पण नागरिक त्याला बघून न बघितल्यासारख करून पुढे निघून जात होते. उडी मारल्याने त्याला जबर दुखापत झाली आहे तसेच त्याचा पाय देखील मोडला आहे. दरम्यान तासभाराने घटनास्थळी पोलिस आले व त्यांनी त्या इसमाला शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले.
उडी मारल्यावर माथेफिरू रस्त्याच्या कडेला तळमळत पडला होता मात्र कोणीही त्याच्या मदतीसाठी आले नाही. त्याच्या तुटलेल्या पायातून रक्त येत होते मात्र तरीदेखील कोणालाही त्याची मदत करावी वाटली नाही हे आश्चर्य. अखेर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली व पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्याला एका रिक्षामध्ये टाकून रुग्णालयात उपचारासाठी नेले. प्राथमिक चौकशीत त्या माथेफिरुने उडी का मारली याची चौकशी करण्यात आली मात्र अद्यापही कारण कळू शकले नाहीये.
महत्वाच्या बातम्या
- ‘आधी दिल्लीची परवानगी घ्या मगच आघाडीचे बोला’, ‘वंचित’चा पटोलेंना टोला
- राज ठाकरे यांचा आज ५३वा वाढदिवस ; ‘या’ ठिकाणी मिळतंय ५३ रुपयांत एक लिटर पेट्रोल
- ‘वडेट्टीवार काम चलावू मंत्री, त्यांना कॅबिनेटमध्येही महत्व नाही’; निलेश राणेंची टीका
- ‘पहिले स्वबळावर आमदार निवडून आणा मग मुख्यमंत्रीपदाचं बोला’, सत्तारांचा पटोलेंना टोला
- ‘शिवसेनेने इटॅलियन विचारधारा स्विकारली यामुळे राम मंदिराला बदमान करण्याची भूमिका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

