Share

अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराने हादरली ; ५ जण ठार

Published On: 

🕒 1 min read

अनापोलिस : अमेरिकेत मागील दोन वर्षांपासून, गोळीबाराच्या घटनेत प्रचंड प्रमाणत वाढ झाली आहे. यामध्ये अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागले असून, आज पुन्हा एकदा अशाच एका गोळीबाराच्या घटनेमुळे अमेरिका हादरून गेली आहे.

अमेरिकेतील अनापोलिस येथील एका इमारतीत झालेल्या अंदाधुंद गोळीबारात ५ जण ठार तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मेरिलँड मधील अनापोलिस येथे कॅपिटल गॅझेट या वृत्तपत्राचे कार्यालय आहे. या कार्यालयातच हा गोळीबार झाला.

याप्रकरणी एकास अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी संपूर्ण इमारत ताब्यात घेतली आहे. दरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या हल्ल्याची सविस्तर माहिती मागवली आहे. एक बंदुकधारी व्यक्तीने दरवाज्यातून कर्मचाऱ्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये ५ जण ठार तर अनेकजण जखमी झाले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!