Share

दारुड्या पतीला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीसह सासू सासऱ्यावर गुन्हा दाखल

Published On: 

औरंंगाबाद : पतीसह सासू सासर्याच्या सततच्या हाणामारीला कंटाळून विवाहीतेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री मुकुंदवाडी परिसरातील जयभवानी नगरात घडली. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी कृष्णा बाबासाहेब पारखे (वय २८, रा.जयभवानीनगर, गल्ली नं १२, मुकुंदवाडी) याला अटक केली असून त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. कांबळे यांनी बुधवारी (दि.१२) दिले.

प्रकरणात मयत कल्पना चे वडील जालींदर संपतराव तेरे (वय ५५, रा. पाचोड, ता. पैठण) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, २०१३ मध्ये कल्पना आणि कृष्णा पारखे यांचे लग्न झाले होते. सहा महिने चांगले वागविल्यानंतर कृष्णा पारखे दारु पिवून तिला मारहाण करीत होता. याबाबत कल्पनाने आपल्या आईवडीलांना सांगितल्यावर कल्पनाच्या आई-वडीलांनी व कृष्णा पाखरे याच्या नातेवाईकांनी त्याची समजूत काढली होती.

दरम्यानच्या काळात दोन आपत्ये देखील झाली. त्यानंतरही कृष्णा पारखे हा दारुच्या नशेत कल्पनाला शिवीगाळ करुन मारहाण करित होता, तसेच आरोपीचे आई वडील देखील तिला मारहाण करित होते. नेहमीच्या त्रासाला कंटाळलेल्या कल्पना कृष्णा पारखे हिने मंगळवारी रात्री गळफास घेवून आत्महत्या केली होती. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!