मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या मुलीच्या लग्नाची सध्या राज्यभरात चर्चा रंगली आहे. राऊत यांची मुलगी पूर्वशी राऊत यांचा विवाह ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी आज(२९ नोव्हें.) होणार असून या लग्नसोहळ्यासाठी राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पूर्वशी-मल्हार यांच्या संगीत सोहळ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) आणि संजय राऊत यांच्या व्हायरल झालेल्या डान्सनंतर आता या लग्नाच्या पत्रिकेमुळे चर्चांना उधाण आले आहे.
या लग्न पत्रिकेमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचे इंग्रजीत लिहिण्यात आले असून पूर्वशी (Purvashi) या इंग्रजी नावातील पी (P) तसेच मल्हार (Malhar) या नावातील एम (M) या अक्षरांना घेऊन #PMkiShaadi हा हॅशटॅग तयार करण्यात आला आहे. हा हॅशटॅग लग्नपत्रिकेवर छापण्यात आला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, लग्नापूर्वी आयोजित संगीत कार्यक्रमात अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी सुप्रिया सुळेंनी केलेल्या आग्रहास्तव संजय राऊत यांनी ठेका धरत डान्स केला. यावेळी त्यांच्या पत्नी वर्षा राऊतदेखील उपस्थित होत्या. सुप्रिया सुळेंनी आग्रह केल्यानंतर त्यांनीदेखील डान्स करत आनंद लुटला.रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या:
- …तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील- मुख्यमंत्री ठाकरे
- दक्षिण आफ्रिकेतून स्वदेशी परतलेल्या व्यक्तीला नव्या व्हेरिएंटचा संसर्ग?
- कायदे मंजूर करताना परिणामांचा विचार न केल्याने समस्या- एन.व्ही.रमण
- …तर राजकीय विरोधकांवर टीका हाच एकमेव कार्यक्रम कसा ठरू शकतो?- संजय राऊत
- ‘काँग्रेसची सूत्रे गांधी घराण्याकडे असणे व भाजपची सूत्रे पंतप्रधानांच्या मुठीतल्या व्यक्तीकडे असणे हे सारखेच’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

