Share

”पुष्पा” मधील श्रीवल्ली गाण्याचा मराठी व्हर्जन; ऐकून व्हाल दंग

Published On: 

मुंबई : नुकताच ‘पुष्पा’ (Pushpa) हा दाक्षिणात्य चित्रपट  प्रचंड गाजला. त्याचबरोबर चाहत्यांकडून चित्रपटातील गाण्यांना देखील मोठी पसंती मिळाली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर या चित्रपटातील गाण्यांवर अनेक रिल्स बनवून शेअर करण्यात आले. मात्र आता ”श्रीवल्ली..’ हे गाणं चक्क मराठी व्हर्जन अन् शब्दबद्दल केले असून त्यावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दरम्यान ”पुष्पा द राईज’ या चित्रपटातील तेलुगूमध्ये तयार करण्यात आलेली गाणी ही मल्याळम, तमिळ आणि हिंदीतही करण्यात आली. मात्र आता एका अवलियाने ”श्रीवल्ली..’ (Srivalli Song From Pushpa) हे गाणं मराठी म्हटलं असून त्यावरील व्हिडिओने सर्वांना चकित केलं आहे. विशेष म्हणजे मराठी वर्जन (Marathi Version) ऐकून रसिकांनीही हे गाणं मराठी करणाऱ्या अवलियाला दाद दिली आहे. या व्हिडिओद्वारे लव्हस्टोरी, मराठी स्रीवल्ली या गाण्यात दिसून आली आहे. विजय खंदारे याने युट्युब चॅनेलवर शेअर केलं आहे.

सुमारे तीन मिनिटं ४४ सेकंदाचा हा व्हिडीओ विजय खंदारेने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यानं (Mobile Camera) शूट केलं आहे. स्वत: विजय खंदारेने गाणं लिहिलं आणि गायल असून त्याच्यासोबत तृप्ती खंदारे यांनी या व्हिडीओमध्ये काम केलंय. तसेच राधिका नागरमोटे, सुहासिनी गुल्हाने, मनिश पतंग्रे, रोशन चौधरी यांनीह या व्हिडीओ काम केलं असून कॅमेऱ्यामन म्हणून आचल खंदारेनं जबाबदारी सांभाळली आहे. अमरावतीमधल्या श्रीनिवास या स्टुडिओमध्ये श्रीवल्लीच्या मराठी वर्जनचं रेकॉर्डिंग करण्यात आलं. अवघ्या काही दिवसांत या व्हिडीओने प्रचंड लोकप्रियता गाठली आहे. या अवलियाने केलेल्या मराठी व्हर्जनला सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी लाईक, कमेंट केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!