Share

सीमाभागातील मराठी भाषिकांनी कर्नाटकाच्या स्वाभिमानाला धक्का पोचविला आहे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय, अत्याचार होत आला आहे. यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानमध्ये आहे का? असा सवाल केला होता. त्यानंतर कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

”भाषावार प्रांतरचनेवेळी कर्नाटकात अडकलेल्या सीमाभागातील मराठी भाषिक आणि हा लढा तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असे वादग्रस्त वक्तव्य पाटील यांनी केले. मराठी भाषिकांनी कर्नाटकाच्या स्वाभिमानाला धक्का सतत पोचविला आहे. त्यांना गोळ्या घाला, असे म्हणण्याचे धाडस दाखवा. मराठी भाषिकांना सीमेवर उभे करून तेथे गोळ्या घाला. त्याला आमचा पाठिंबा असेल. त्याचे काय परिणाम होतील, ते होऊ दे. सीमाप्रश्न एकदा संपविला जावा.”

पाटील म्हणाले, गेल्या ६४ वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न भिजत पडला आहे. या कालावधीत येथील मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या सार्वजनिक मालमत्तेची हानी केली. काट्याप्रमाणे विषय रुततो आहे. त्यासाठी कायम स्वरुपी तोडगा म्हणून मराठी भाषिक आणि म. ए. समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर गोळ्या घालून विषय संपवा, अशी वादग्रस्त मागणी पाटील केली. याचे सीमाभागात पडसाद उमटले असून जागीगागी निषेध नोंदविला जात आहे. भीमाशंकरच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!