Share

नाशकात १९ ते २१ नोव्हेंबरला मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या सात महिन्यांपासून रहित झालेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखेर १९ ते २१ नोव्हेंबरला नाशिकमध्ये होणार आहे. त्यानुसार तयारीला लागण्याच्या सूचना संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समित्यांना दिल्या. तयारी जरी सुरु करण्यात आली असली तरी संमेलनावर कोरोनाची टांगती तलवार मात्र कायम आहे.

मार्च महिन्यातल्या २६ ते २८ मार्चच्या दरम्यान हे साहित्य संमेलन होणार होते. त्यासाठी निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या होत्या. त्या संबंधितांपर्यंत पोहचल्याही होत्या. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे हे संमेलन पुढे ढकलावे लागले. जुलै महिन्यात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतुकराव ठाले-पाटील यांनी पालकमंत्री छगन भुजबळांना पत्र पाठवले होते. त्यात जुलै महिन्यात साहित्य संमेलना भरवणे शक्य आहे का, अशी विचारणा केली होती. मात्र, त्यावेळेसही त्यांना नकार कळवण्यात आला होता. मात्र, आता दसऱ्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आढावा घेऊन दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये साहित्य संमेलन घेण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आणि लोकहितवादी मंडळ निमंत्रक असलेले हे संमेलन अखेर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात यापूर्वीच ठरलेल्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर होणार आहे. संमेलनासाठी काम करणाऱ्या चाळीस-पंचेचाळीस समित्यांना आपले काम वेगाने करण्याच्या सूचना स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समितीप्रमुख विश्वास ठाकूर यांना दिल्या आहेत. आयोजकांच्या या निर्णयामुळे साहित्यरसिकांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, नाशिकमधील कोरोनाची स्थिती लक्षात घेता संमेलन नाशिकमध्ये घेता येईल की रद्द करावे याबाबतही अनेक चर्चा करण्यात येत होत्या. त्यानुसार अजूनही संमेलनावर कोरोनाचे सावट आहेच. असे असले तरी सध्याची एकूण परिस्थिती पाहता संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या विविध समित्या कार्यरत झाल्या असून आजपासून या समित्यांच्या बैठकांनादेखील सुरुवात होणार आहे. संमेलन होणार असल्याने साहित्यप्रेमीसह नाशिककरांकडून आनंद व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!