Share

#कोरोना : महाराष्ट्राचा सुपूत्र ओडीसात करतोय कोरोनाला रोखण्यासाठी जनजागृती

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चिंतेचे वातावरण आहे. केंद्र सरकारने देशातील नागरिकांना सुरक्षेसाठी घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर ओदिसातील गंजाम भागात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. याच सर्व श्रेय जातं ते ओदिसाचे जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांना. प्राथमिक शिक्षक, विक्रीकर अधिकारी ते तहसीलदार, अशा क्रमाने जिल्हाधिकारी झालेले कुलांगे सध्या ओडीसातील गंजाम जिल्ह्यात कार्यरत आहेत.

मुळचे नगरचे असलेले विजय कुलांगे कोरोनाला रोखून धरण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवताना दिसत आहेत. मुंबई, सुरत, केरळ येथून तब्बल २२००० लोक गंजामला आले आहेत, या सर्वाना होम क्वारंटाईन’ केले असले, तरी एकही बाधित रुग्ण अद्याप त्या ठिकाणी आढळून आला नाही. कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी ते थेट सायकलवरून स्थानिक नागरिकांशी संपर्क साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. प्रशासनाचे त्यांच्यासोबत माणुसकीचे नाते निर्माण करीत आहेत.

दरम्यान, कोरोनाचे वादळ जगभर घोंघावत असताना, गंजाममध्ये बाहेरून आलेल्या २२०००  लोकांना सुरक्षित क्वारंटाईन’ करण्याची भूमिका कुलांगे यांनी अत्यंत खुबीने निभावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्वप्रथम जिल्ह्यात देऊळबंदीचा निर्णय घेतला. कोरोनाची भीती ओळखून वेळीच सुरू केलेल्या उपाययोजना आज तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपयोगी ठरल्या आहेत.

याबाबत कुलांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ” गंजाम जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडणार नाही, याची दक्षता प्रशासन घेत आहे. त्यासाठी लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना घराबाहेर न पडण्याचे महत्त्व पटवून दिले. सायकलवर जाऊन आपुलकीने विचारपूस केली. कुटुंबातीलच कुणी तरी आपल्याशी बोलतेय, असे त्यांना वाटते. त्यामुळे ते अजून भक्कमपणे कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रवृत्त होत असल्याचा अनुभव आहे. ”

त्याचप्रमाणे देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून गंजाममधेय आलेल्या २२०००  जणांना क्वारंटाईन मध्ये ठेवले असून त्या सर्वांची दिवसातून एकदा हाजेरी घेतली जाते. तर होम क्वारंटाईन’ केलेल्या लोकांच्या घरांच्या दरवाजांवर होम क्वारंटाईनचे स्टिकर लावण्यात आले आहेत. या कामासाठी कुलांगे यांनी मोठ्या प्रमाणात महिलांची मदत घेतली आहे. त्यासाठी बचतगटांच्या महिलांचे व्हॉट्सऍप ग्रुप तयार केले. रोज त्यांना सूचना देऊन घरात त्याची अंमलबजावणी करून घेतली जाते. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!