मुंबई : ‘केसरी’ चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक सुजय डहाकेने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने जातीयवादाने पोखरलेल्या मराठी चित्रपटसृष्टीबद्दल वक्तव्य केले. सध्या मराठीमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही? असा सवाल सुजयने विचारला होता.
याच पार्श्वभूमीवर अनेक स्तरातून त्याच्या वक्तव्यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. यावर आता मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनं सुजयचं नाव न घेता त्याला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे.
तसेच तेजश्री प्रधान हिनं आपल्या फेसबुक वॉलवर एक पोस्ट शेअर केली आहे. “मी ब्राह्मण नाहीये बरं! सीकेपी आहे. पण गेली अनेक वर्ष माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणूया का?”, अशा आशायची पोस्ट तिनं फेसबुक वॉलवर शेअर केली आहे.
दरम्यान, सुजय डहाकेचा ‘केसरी’ हा चित्रपट २६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात कुस्ती म्हणजे नुसतीच मस्तवाल शरीराची मस्ती नाही, तो बुध्दीचातुर्याने आणि मनापासून खेळला जाणारा खेळ आहे, हे दाखवण्यात आले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
