Share

मराठा आरक्षण : आत्महत्यासत्र थांबेना औरंगाबादमध्ये तरुणाची आत्महत्या

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक समाज बांधव आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. औरंगाबादमध्ये एक अशीच एक घटना समोर आली असून मुकुंदवाडी भागात रेल्वेखाली उडी मारून प्रमोद पाटील या तरुणाने आत्महत्या केली आहे. मुकुंदवाडी रेल्वे गेट नंबर ५१ येथे रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. हा प्रकार कळताच मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मुकुंदवाडी बंदची हाक दिली त्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. महत्वाची बाब म्हणजे या तरुणाने मराठा आरक्षणासाठी जीव देत असल्याची माहिती फेसबुकवर जाहीर केली होती.

प्रमोद पाटील हा तरुण मराठा समाजातून येत असून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. मात्र आरक्षणा नसल्याने तयारी करून देखील समाज बांधवांना संधी मिळत नाही यामुळे तो नाराज झाला होता, अशी माहिती मिळत आहे. अखेर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपला जीव देत असल्याचे त्याने फेसबुकवर फोटो पोस्टमधून जाहीर केले होते. मराठा आरक्षणासंदर्भात काल रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक पोस्ट टाकली होती. ‘चला आज एक मराठा जातोय… पण काही तरी करा… मराठा आरक्षणासाठी करा जय जिजाऊ… आपला प्रमोद पाटील…’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. तर दुसरी पोस्ट चार वाजून पन्नास मिनिटांनी टाकत त्यात मराठा आरक्षण जीव जाणार असे नमूद केले होते. दुसरी पोस्ट टाकतेवेळी रेल्वे रुळावर सेल्फी काढला होता. अखेर मध्य रात्री मुकुंदवाडी भागात धावत्या रेल्वेखाली उडी घेत त्याने आत्महत्या केली, असे पोलीस तपासात समोर आले आहे.

राज्यभरात सुरु असलेलं मराठा क्रांती मोर्चाचे हे आंदोलन काही ठिकाणी शांततेत सुरु आहे, तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील परळीतही 18 जुलैपासून मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं, जे अद्याप सुरुच आहे.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या

मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.

मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.

राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.

आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.

मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.

मूळ आरक्षण असलेल्या जाती-जमातींचेच आरक्षण रद्द करण्याचा सरकारचा डाव – जितेंद्र आव्हाड

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!