Share

मराठा आरक्षण : आता फक्त ठिय्या आंदोलन,रस्त्यावर आंदोलन न करण्याचा निर्णय

Published On: 

परळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अवघा महाराष्ट्र पेटून उठला होता. गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पुढील मोर्च्यासाठी रस्त्यावर आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यात जो हिंसाचार झाला त्याचा क्रांती मोच्याशी संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सरकारकडून ७ ऑगस्टपर्यंत समाजाच्या सर्व मागण्यांवर विचार व्हावा अन्यथा राज्यभर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी सकल मराठा मोर्चाकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे.यापुढे मागण्यांसाठी राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. जोवर मागण्या मान्य होत नाहीत तोवर मोर्चा सुरूच राहिल असे आंदोलकांनी स्पष्ट केले. तसेच आरक्षाबाबत चंद्रकांत दादा पाटील यांची उप- समिती तात्काळ बरखास्त करावी अशी मागणी करण्यात आली.

राज्य शासनाच्यावतीने लेखी आश्वासन येत नाही तोपर्यंत परळीतील आंदोलन स्थगित होणार नाही. मात्र, राज्यात आंदोलकांव्यतिरिक्त बाहेरच्या लोकांकडून घडवून आणलेला हिंसाचार लक्षात घेता, आंदोलकांनी कुठल्याही स्वरुपात खासगी, सरकारी वाहनांचे नुकसान करु नये. इथून पुढची सर्व आंदोलने ठिय्या स्वरुपातच करावीत असे आवाहनही यावेळी सकल मराठा मोर्चाकडून करण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनामुळे जी हिंसा झाली, त्याबद्दल बैठकीत चिंता व्यक्त केली जात असून आंदोलनात असामाजिक तत्त्व घुसल्यामुळे हिंसाचार घडला असे आंदोलकांनी स्पष्ट केले. मोर्च्याचा उद्देश सपूर्ण राज्यात फक्त ठिय्या आंदोलन करणं हाच होता असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

इंदापूर विधानसभेची निवडणूक आपणच लढवणार! हर्षवर्धन पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!