Share

Ramesh Kere । मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: 

Ramesh Kere | मुंबई :  मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी फेसबुक लाईव्ह करून विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रमेश केरे पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मराठा मोर्चावेळी राजकीय नेत्यांकडून पैसे घेतले असल्याचा  आरोप करण्यात आला होता. सोशल मीडियावरून होत असलेल्या गंभीर आरोपांनंतर रमेश केरे पाटील यांनी आज थेट फेसबुक लाईव्ह करत स्वत:चं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्याने केरे पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

रमेश केरे पाटील यांनी विष प्राशन करण्याआधी आपल्यावर होत असलेल्या विविध आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, ‘मागील २० वर्षांपासून मी मराठा समाजातील विविध प्रश्नांवर लढा देत आहेत. मी कधीही समाजाला विकण्याचं काम केलेलं नाही. चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर माझ्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोकांनी गंभीर आरोप केले. मात्र मी कधीही कोणाकडून एक रुपयाही घेतलेला नाही,’ असं म्हणत रमेश केरे यांनी स्पष्टीकरण दिल आहे.

मराठा बांधवांशी संवाद साधत असतांना “आशा, अक्षर भैया, गौरी मला माफ करा, मी आजवर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आलोय, मात्र सोशल मीडियावर मला जाणून बुजून बदनाम केलं जात आहे. हे माझं शेवटचं फेसबुक लाईव्ह असेल” असं म्हंटल आहे.

मुंबईत रमेश केरे (Ramesh Kere) यांनी आत्महत्येचा केला प्रयत्न

‘मराठा मोर्च्यात झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीची चौकशी होऊन संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करावेत. तसंच ज्या लोकांनी माझ्यावर खोटे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी रमेश केरे पाटील यांनी केली आहे. मुंबईत त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न ( Ramesh Kere Suicide Attempt ) केला आहे. सध्या त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मराठा क्रांती मोर्चाबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये केरे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप होता. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. हा मराठा क्राती मोर्चासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. मराठा मोर्च्याशी संबंधित असलेल्या रमेश केरे (Ramesh Kere) यांनी थेट फेसबुक लाईव्हवरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!