Share

मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन, औरंगाबादमध्ये आंदोलक ताब्यात!

Published On: 

औरंगाबाद: मराठा क्रांती मोर्चातर्फे आता ‘आत्मबलिदान’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. कायगाव टोका येथे आज (23 जुलै) आंदोलन करण्यावर मराठा कार्यकर्ते ठाम होते. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही, त्यामुळे आंदोलन सुरु केल्याने पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी आंदोलकांना गंगापूर फाटा येथे अडवले. पोलिसांनी आंदोलकांना काकासाहेब शिंदे समाधीस्थळी जाण्यास मज्जाव केला. कायगाव टोका इथे आंदोलक जाणार आहेत. मात्र पोलिसांनी आंदोलकांना गंगापूर फाटा इथेच रोखल्याने आंदोलकांनी तिथेच ठिय्या दिला. पोलिसांनी या भागात संचारबंदी लागू केली आहे.

यापुढे फक्त सातारा नाही तर संपूर्ण राज्यातील जनतेसाठी काम करणार: खासदार छत्रपती उदयनराजे भोसले

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात आपले जीव गमावलेले मराठा समाजाच्या तरुणांच्या कुटुंबाला राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने कोणतीही मदत दिली नाही. त्यामुळे मृतांच्या कुटुंबाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारला 10 दिवस आधीच आंदोलनाचा इशारा दिला होता. तरी देखील सरकारने कोणतेही पाऊल उचललं नाही, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी सांगितले.

मराठीत शपथ घेणाऱ्या शिवसेनेच्या वाघिणीचे ‘मनसे’ कौतुक

मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी काकासाहेब शिंदे या आंदोलकाने २०१८ मध्ये गोदावरी नदीत उडी घेऊन बलिदान दिले होते. या घटनेला आज(ता. २३) दोन वर्षं होत आहेत. त्यानिमित्त शिंदे यांना श्रद्धांजली व मराठा आरक्षण समितीने आंदोलनाचा दिलेल्या इशाऱ्यामुळे येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन नगर जिल्हा पोलिसांनी आज नगर- औरंगाबाद महामार्ग बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे.

…तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, उदयनराजे गरजले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!